तळेघर: घोडनदी वर गंगापूर, लाखणगाव, पारगाव व शिरुर तालुक्यातील म्हसे येथे झालेल्या अर्थसंकल्पात पुलाची कामे मंजूर झाली आहेत, तसेच मंचर येथे प्रांत कार्यालय बांधण्यासाठीही निधी दिला असल्याचे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
भीमाशंकर येथे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते राज्यमार्ग क्र. ११२ वरील भीमाशंकर ते निगडाळे या सात कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन झाले, तसेच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथील शासकीय आश्रम शाळा ते गाडेवाडी उंडेवाडी या ८० लाख रुपयांच्या रस्त्याचे राजपूर (गाडेवाडी) येथे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे, तळेघर ते जांभोरी या ८० लाख रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन तळेघर येथे करण्यात आले.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष ॲड.सुरेश कौदरे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, शरद बँक संचालक बाळासाहेब बाणखेले, पं.स.माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, कृ.उ.बा.स.माजी सभापती प्रकाश घोलप जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अक्षय काळे, सरपंच दत्तू हिले राजपूरच्या सरपंच कमलताई लोहकरे सामाजिक कार्यकर्ते का.बा. लोहकरे तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले यावेळी उपस्थित होते.
भीमाशंकर ते निगडाळे या रस्त्याच्या मजबुतीकरण करण्याची मागणी गेले अनेक वर्षांपासून होती, परंतु वनविभागाच्या परवानगीमुळे हे काम राहिले होते, परंतु आता या रस्त्याला परवानगी आली असून, अनेक वर्षांपासून भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
१५
भीमाशंकर- निगडाळे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित असलेले दिलीप वळसे-पाटील.