बाणेर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा ही संकल्पना बाणेर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी मांडली होती. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रल्हाद सायकर यांनी प्रयत्न केले. त्याचे भूमिपूजन उद्घाटन १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी झाले.
याप्रसंगी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, महाराजांचा पुतळा बाणेर गावात असावा म्हणून ही संकल्पना सायकर यांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ यासाठी प्रयत्न करून त्याचे कामही सुरू केले. भूमिपूजन वेळी सांगितल्याप्रमाणे पतसंस्थेच्या वतीने ही आर्थिक मदत केली जात आहे. त्यांनी स्वतः १ लाख ११ हजार १११ रुपये अजून देणार असल्याचे सांगितले. तसेच डॉ. मुरकुटे यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर संजय ताम्हाणे यांनी यावेळी ५१ हजार रुपये मदत करत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी डॉ. दिलीप मुरकुटे, राजू शेडगे, लहू सायकर, संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार, ॲड. पांडुरंग थोरवे, अध्यक्ष विजय विधाते, उपाध्यक्ष शशिकांत दर्शने, स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रल्हाद सायकर, गणेश मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.