रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या विशेष प्रयत्नातून रांजणगाव गणपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण इमारतीस रंगरंगोटी करण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून पाच लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीचा धनादेश पाचुंदकर यांनी रांजणगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोडेराव, डॉ. महेश सातव यांच्याकडे सुपूर्त केला.
या वेळी विस्ताराधिकारी प्रकाश आव्हाड, जनसंपर्क अधिकारी शेळके, आरोग्य सहायिका शीला झाटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायळ, बबन शेळके, रवींद्र तांदळे, विजय जाधव, रोहन जाधव, आरोग्यसेविका राधिका नरगिडे, संजय फराटे, विनिता माने तसेच सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. या वेळी राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर व स्वाती पाचुंदकर या दाम्पत्याने आपली मुलगी आराध्या हिच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वर्षभरासाठी पुरतील इतके पारु किट या आरोग्य केंद्रास उपलब्ध करून दिले.
२६ रांजणगाव गणपती
रांजणगाव गणपती प्रा. आरोग्य केंद्रास ५ लाख रुपयांचा धनादेश स्वाती पाचुंदकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोडेराव यांच्याकडे सुपूर्द केला.
===Photopath===
260521\26pun_1_26052021_6.jpg
===Caption===
रांजणगाव गणपती प्रा.आरोग्य केंद्रास ५ लाख रुपयांचा धनादेश स्वाती पाचुंदकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल घोडेराव यांच्या कडे सुपूर्द केला.