- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहराचा वैभवशाली इतिहास वारसास्थळांच्या माध्यमातून जपला गेला आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महापालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे. मात्र, वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने लागणारा निधी अपुरा आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती, नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे.महात्मा फुले मंडई, विश्रामबागवाडा, लाल महाल, नागेश्वर मंदिर, नानावाडा अशी वारसास्थळे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत. या स्थळांची देखभाल-दुरुस्ती, नूतनीकरण अशा कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ठराविक तरतूद करण्यात येते. मात्र, नागरी सुविधांच्या तुलनेत हेरिटेज सेलसाठी कायमच कमी निधीची तरतूद केली जाते.अपुºया निधीचा थेट परिणाम कामांच्या वेगावर आणि दर्जावर होत असल्याचे मत जाणकारांनी नोंदविले आहे. पुण्याचे हे वैभव जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न अपुरे पडत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.महापालिकेतर्फे २०१८-१९ मध्ये मंडई, लालमहाल, नानावाडा, विश्रामबागवाडा येथील विकास आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. पुणे टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी टुरिझम मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्याअनुषंगाने विकासकामे करणे याअंतर्गत मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. २०१९-२०च्या दृष्टिक्षेपातील अंदाजपत्रकानुसार, नानावाडा येथील पेशवेकालीन आणि दगडी इमारतीची उर्वरित टप्प्यातील जतन-संवर्धनाचे काम, विश्रामबागवाडा, मंडई येथील काम, विविध प्रकारचे हेरिटेज वॉक, मिनीबस टूर आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. मात्र, या कामांसाठी लागणाºया निधीची पुरेशी तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे वारसास्थळांची दुरवस्था कायम आहे आणि सध्याची कामेही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
हेरिटेज सेल विभागाकडून पालिका प्रशासनाकडे अनेकदा जास्त निधीची मागणी करूनही अद्याप ती पूर्ण न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहेच. मात्र, शहरातील नागरिक, संस्था यांनीही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. ही वास्तू आपली आहे, असा भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला पाहिजे.
वारसास्थळांच्या ठिकाणी महापालिकेच्या परवानगीने विविध उपक्रमांचे आयोजन करुन संस्कृतीचे आदान-प्रदान घडवून आणता येऊ शकते. यातून पर्यटनाला प्रोत्साहन, रोजगार वाढण्यास मदत होते. यामध्ये स्थानिक नेत्यांना सहभागी करुन घेऊन देखभाल, दुरुस्तीसाठी लागणारा निधी मिळवणे, प्रशासनाकडे मागणी करणे शक्य होते. बाह्य सुशोभीकरणातून स्थळाचे सौंदर्य खुलते, पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.- श्याम ढवळे, हेरिटेज सेल, निवृत्त अधीक्षक अभियंतापुण्यातील ऐतिहासिक वास्तूंकडे आजवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते. गेल्या काही काळात वारसास्थळांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, दफ्तर दिरंगाई आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे निधी अपुरा पडत आहे. ही अडचण टाळून महापालिकेने हा वारसा जतन आणिं संवर्धन केला पाहिजे. सर्वपक्षीय नगरसेवक, नेत्यांनी यासाठी एकत्र यावे.- पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञवारसास्थळांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी जास्त निधीची आवश्यकता असते. संबंधित स्थळाच्या गरजेनुसार, नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाते. मात्र, अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद होत नाही. अनेकदा मागणी करूनही निधीची रक्कम वाढविण्यात आलेली नाही.- हर्षदा शिंदे,अभियंता, हेरिटेज विभाग