खोडद : अनेक वर्षांपासून नारायणगाव ते खोडद रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक वारंवार मागणी करीत होते. नारायणगाव-खोडद या सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या रस्त्याचे सलग काम होणार असून पुढील १५ दिवसांत ते सुरू केले जाईल. सातपुडा ग्रामस्थांनी शेडची मागणी केली होती. मी माझ्या स्वनिधीतून हे शेडचे काम करणार आहे, अशी माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी हिवरेतर्फे नारायणगाव येथे दिली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील सातपुडा जिल्हा परिषद शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. सोनवणे म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या रस्त्याचे तसेच तालुक्यातील अन्य रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. सध्या जुन्नर तालुक्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत. श्रीक्षेत्र अष्टविनायक जोडमार्ग रस्त्यांची कामेदेखील लवकरच सुरू होणार आहेत. रस्त्यांशिवाय विकास होऊ शकत नाही. रस्ते होणे म्हणजे विकासाचा मार्ग आहे.नारायणगाव-खोडद रस्त्याचे २०१०मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करण्यात आले होते. २०१० ते २०१५ हा या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी होता. यादरम्यान रस्त्याची डागडुजीकरण्यात आली होती. दोषदायित्व कालावधी संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनदेखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.सन २०१५नंतर या रस्त्याचीखूपच दुरवस्था झाली होती.अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या नसल्याने अपघाताचा धोकानिर्माण झाला आहे. यारस्त्यावर आजपर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात होऊनत्यात जीवितहानीदेखील झालीआहे. या रस्त्याची दुरुस्तीव्हावी, अशी नागरिकांकडूनवारंवार मागणी केली जात होती.