नीरेत फर्निचरच्या दुकानाला आग, एक कोटी रुपयांचे नुकसान नीरा : पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जेजुरी, सोमेश्वर व नीरेतील अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग नियंत्रणात येण्यापूर्वीच दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या नीरेतील सचिन बर्गे, रवींद्र धायगुडे व संतोष वाघमारे या तीन युवकांनी नुकतेच सचिन फर्निचर व लक्ष्मी स्टील सेंटर नावाचे दुकान चालु केले होते. लग्नसराई सुरू झाल्याने दुकानात नवीन माल भरपुर प्रमाणात भरला होता. रात्री एकच्या दरम्यान दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शिवाजी चौकातील चहा विक्रेते नितीन अग्रवाल यांना माहिती दिली त्यांनी प्रथम पोलिस दुरक्षेत्राशी संपर्क साधला. नीरेतील तसेच पिंपरे खुर्द येथील युवकांनी ज्युबिलंट कंपनी, सोमेश्वर कारखाना तसेच जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांना कल्पना दिली. तीन आगीच्या बंबांनी सात टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. परंतु,आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व लाकडी फर्निचर, फ्रिज, मिक्सर, ओव्हन, कपाटे, कुलर, टेबल खुर्ची, मोठ्या प्रमाणावर स्टिल, तांब्या पितळेची भांडी असे सुमारे एक कोटी रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले आहे. तसेच दुकानाचे देखील सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नीरेत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, एक कोटी रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:01 PM
पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देलग्नसराई सुरू झाल्याने दुकानात भरपुर प्रमाणात नवीन माल