पुणे : लोकशाहीमधील मतदान हे आद्य कर्तव्य म्हटले जाते़ पण ते करण्यास शहरी मतदार फारसा उत्सुक दिसून येत नाही़. आम्ही गडचिरोली, नागपूर आणि पुण्यात मतदानाचा बंदोबस्त केला़. नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा धाक असतानाही जे उत्स्फूर्तपणे मतदानाला येतात. ते गडचिरोलीचे आदिवासी पुणेकरांपेक्षा जास्त सुशिक्षित असल्याचे निरीक्षण उत्तर प्रदेशातून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांनी नोंदविले़. केंद्रीय राखीव दलाची कंपनी पुण्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी आली आहे़. शहरातील काही संवेदनशील मतदान केंद्रांवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती़. त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला़ तेव्हा ते म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेशातील आहोत़. यापूर्वी आम्ही गडचिरोली व नागपूरला बंदोबस्तावर होतो़ पाच दिवसांपूर्वी पुण्यात आलो़. गडचिरोलीतील आदिवासी भाग नक्षलग्रस्त असल्याने त्या ठिकाणी खूपच सतर्क राहावे लागत होते़.. संपूर्ण दिवस लक्ष ठेवावे लागत होते़. मात्र, तेथील लोक अगदी शिस्तीत येत होते़ येणाऱ्यामतदारांकडे त्याचे मतदान कोठे आहे, याची त्यांना माहिती होती़. ते सरळ येऊन रांगेत उभे रहात होते़ तेथे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होते़. त्याच्या आत सर्वच आले होते़ त्यांना काही सांगावे लागले नाही़ नक्षलवाद्यांची भिती असतानाही तेथे मोठे मतदान झाले़. त्याच्या पूर्णपणे विरुद्ध परिस्थिती पुण्यात आले़ येथे बंदोबस्ताचा ताण नव्हता़ काही वेळ विश्रांतीही मिळत होती़. पण, येथे येणाºया मतदारांकडे त्यांचे मतदान कोठे आहे, याची माहिती नव्हती़. अनेकांकडे त्यांचे मतदान कोठे आहे, याची स्लीपही नव्हती़. त्यांना सांगावे लागत होते़ काही जणांना त्यांचे नाव सापडत नव्हते़. येथे लोक सुशिक्षित असूनही पुरेशी माहिती न घेता मतदान केंद्रावर येत होते़. येथे सहा वाजेपर्यंत वेळ असतानाही मतदान कमी झाले़ काही जण तर सहा वाजल्यानंतरही धावत येताना दिसत होते़. त्यांना मतदान करता आले नाही, असे त्यांनी मत नोंदविले़. यापुढे २९ एप्रिलला पुण्यातच मतदानासाठी आमची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़.
पुणेकरांपेक्षा गडचिरोलीचे आदिवासी जास्त सुशिक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 5:32 PM
केंद्रीय राखीव दलाची कंपनी पुण्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी आली आहे़.
ठळक मुद्देकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांचे मत