पुणे : सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार माओवादी संघटनांशी संबंध असलेल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयात केली. अॅड. गडलिंग यांनी मागील सुनावणी वेळी देखील न्यायालयात ही तक्रार केली होती. त्या कोठडीत आम्हाला कधी-कधी तीन तास ठेवले जाते, असे त्यांनी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांना सांगितले. गडलिंग यांचा स्वत:च्याच जामिनावर मंगळवारी युक्तीवाद होणार होता. परंतु, ही सुनावणी आता आज (बुधवारी) होणार आहे. याप्रकरणातील इतर आरोपी महेश राऊत, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांच्या जामीनावर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. दरम्यान अॅड.निहालसिंग राठोड यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय गडलिंग यांच्या बरोबर बोलू नये, अशा सुचना न्यायालयाने केल्या. व्हर्णन गोन्साल्वीस, अॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांची पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रा. शोमा सेन यांचा जामीन न्यायालयाने यापुर्वी फेटाळला आहे.
कोठडीतील दुर्गंंधीबाबत अॅड. गडलिंग यांची पुन्हा न्यायालयात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 9:59 PM
सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार गडलिंग यांनी न्यायालयात केली.
ठळक मुद्दे