पुणे : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून '''''''' गीतरामायण'''''''' अजरामर करणारे ग. दि. माडगूळकर यांचे ''''''''वाटेवरल्या सावल्या'''''''' हे आत्मचरित्र आता इंग्रजीमध्ये वाचकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ डिसेंबरला गदिमांची ४३ वी पुण्यतिथी. या पार्श्वभूमीवर मराठीतील ही दर्जेदार कलाकृती जागतिक भाषेमध्ये उपलब्ध होणे ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे.
गदिमांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी ‘गदिमा साहित्य कला अकादमी‘ स्थापन केली आहे. गदिमांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त (१ ऑक्टोबर) अकादमी’ तर्फे सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता आणि प्रा.उल्हास बापट यांच्या प्रयत्नांमुळे ''''''''वाटेवरल्या सावल्या'''''''' हे आत्मचरित्र ''''''''द शॅडोज ऑफ सॉलेस ऑन द पाथ'''''''' या नावाने इंग्रजीत पुस्तक रूपात आले आहे. प्रा.विनया बापट यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. दोन वर्षांपूर्वी गदिमांच्या जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक १४ कथांचे ''''''''सिलेक्ट शॉर्ट स्टोरीज ऑफ ग. दि.माडगूळकर'''''''' या नावाने इंग्रजीत रूपांतर देखील प्रा.विनया बापट यांनी केले होते. आता गदिमांच्या आत्मचरित्राने गदिमांच्या आयुष्यातील संघर्षाचा व तत्कालीन समाजजीवनाचा नवीन पैलू इंग्रजी वाचकांसमोर आला आहे. इंग्रजीतील हे आत्मचरित्र गदिमांचे ज्येष्ठ पुत्र कै.श्रीधर माडगूळकर यांना अर्पण करण्यात आले आहे.
याविषयी सुमित्र माडगूळकर म्हणाले, ''''''''वाटेवरल्या सावल्या'''''''' हे गदिमांचे अपूर्ण राहिलेले आत्मचरित्र. त्यांच्या जन्मापासून ते त्यांचा संघर्ष थोडा कमी होऊन त्यांचा ''''''''वंदे मातरम'''''''' चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत झालेला प्रवास गदिमांनी या आत्मचरित्रात वर्णन केलेला आहे. विशेष म्हणजे गदिमांचे अपूर्ण आत्मचरित्र जेथे संपते तेथूनच गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांचे आत्मचरित्र ''''''''आकाशाशी जडले नाते'''''''' सुरु होते व गदिमांच्या मृत्यूपर्यंत सहजीवनाची कथा पूर्ण करते. दुर्दैवाने ''''''''वंदे मातरम'''''''' चित्रपटानंतर गदिमांना मिळालेले चित्रपटसृष्टीतील व साहित्यातील अभूतपूर्व यश जर गदिमांच्या लेखणीतून समोर आले असते तर रसिकांना ती एक मोठी पर्वणी ठरली असती. पण, १९७७ साली गदिमांच्या अकाली निधनाने हे आत्मचरित्र पूर्ण होऊ शकले नाही.
......