पुणे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लेखक अशोक टाव्हरे लिखित ‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन परिवहन भवन नवी दिल्ली येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे खासगी सचिव (आयएसएस) संकेत भोंडवे उपस्थित होते.
लेखक अशोक टाव्हरे हे कनेरसर (ता. खेड) येथील रहिवासी आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित ‘विकासाचा राजमार्ग’ या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. गडकरी यांनी इंग्रजी पुस्तकासाठी लेखी परवानगी दिली आहे.
नितीन गडकरी यांचा १९७६ पासूनचा राजकीय प्रवास तसेच महाराष्ट्राचे पाच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गेली सात वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी दाखवलेल्या कार्यक्षमतेचा आढावा अशोक टाव्हरे यांनी या पुस्तकात घेतला आहे.
फोटो : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) संकेत भोंडवे आणि अशोक टाव्हरे.