पुणे : नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विजय गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' अशी नाटके लिहिणारे राम गणेश गडकरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे अभिवाचन विजय कुलकर्णी, श्रीराम रानडे यांनी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात केले.या वेळी रानडे म्हणाले, ‘‘साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते. गडकरी यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकरी यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरींची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्यांच्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.’’
विनोदी लिखाण करणाऱ्या लेखकाची ही दवा आपल्याला आमंत्रण करणारी पाहिजे. विनोद ही गडकऱ्यांच्या लेखणीची शाई होती. गडकरी यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
- विजय कुलकर्णी