- दीपक होमकर
पुणे : तो पापण्यांनी तब्बल चार खुर्च्या उचलून दाखवतो, दोन्ही हाताला दोरी बांधून दोन्हीकडे दोन ऐंशीचा वेग घेतलेल्या मोटारसायकल जागेवर थांबवून दाखवतो, आल्या मोठ्या दगडाला दोरीने बांधून तो वजनदार दगड दाताने पाच पाच फूट लांब फेकून दाखवतो, डोक्याच्या केसांना दोरी बांधून त्याच दोरीने पोलिसांची अख्खी व्हॅन ओढून दाखवतो... हो असा अवलिया सध्या पुणे शहराच्या आसपास विविध गावांमध्ये त्याचे हे खेळ सादर करतोय... त्याचं नाव आहे गफूर बशीर सय्यद.
तुम्हाला वाटत असेल इंडिया गॉट टॅलेंट मधला किंवा शाबास इंडिया मधला एखादा आवलीया आहे. तर तुमचा हाही अंदाज खराच आहे. टीव्हीवरील हे दोन्ही शो गाजवून गफुर आता पुण्यातील विविध गावागावांमध्ये हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आला आहे. मात्र यावेळी त्या शो सारखी चमक-धमक आणि ग्लॅमर नाही. तर रस्त्यावर संसार मांडून ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या सहकार्याने गावातल्या मैदानात हा खेळ सुरू आहे.
गावागावात जाऊन विविध साहसी खेळ दाखवायचे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर सिद्धार्थ चालवायचे कपूर यांचा आजोबांपासून चा पारंपारिक व्यवसाय. याच व्यवसायाच्या निमित्ताने गफूर मोटरसायकलवर पुण्यात आला आणि त्याच्या मोटरसायकलला बांधलेल्या गाड्यांवरील अख्खा संसार लेकरा बाळांसहित त्याच्या पाठीमागे दाखल झाले.
एखाद्या गावामध्ये दोन-तीन दिवस मुक्काम करायचा त्या गावासह इतर ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आणि संस्थांना भेटून हा चार पाच हजार यांच्या मानधनावर असे खेळाचा कार्यक्रम ठरवायचा आणि दररोज संध्याकाळी आठ ते साडेनऊच्या वेळात हे कार्यक्रम सादर करायचे असा त्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच्यातील हे टॅलेंट पाहून अनेकांना प्रचंड आश्चर्य वाटतं अनेकदा ग्लॅमरची दुनिया ही त्याला खुणावते पण तेथील चमकदमक काही क्षणांपुरतेच आहे हे लक्षात आल्याने गफूरने पुन्हा पारंपरिक पद्धतीने रस्त्यावरच जगणं सुरू केले.
आठपैकी सहा भावांचा हाच व्यवसाय
कपूर यांना तब्बल आठ भाऊ आहेत, कपूरचे वडील जेव्हा हा व्यवसाय करायचे तेव्हा हे सगळे भाऊ त्यांच्याबरोबर असेच गावोगाव फिरायचे. यातूनच या सर्व भावांना हे सहसी खेळ अवगत झाले. त्यातील दोन भाऊ वगळता उर्वरित सहा भावांनी हाच खेळ व्यवसाय म्हणून स्विकारला. असले तरी तो पूर्ण मात्र नाशिकच्या त्याच्या गावातच आई-वडिलांकडे त्याच्या मुलांना ठेवला आहे आणि त्यांना त्यांनी शाळेतही घातलं आहे.