संतोष मधुकर मांजरे (वय ३५, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड,) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसीत संतोष हा लोकांना दमदाटी करून या भागातील कंपन्यांना पाण्याचे टॅंकर पुरवत होता. या प्रकारातून त्याचे अनेक लोकांशी टोकाचे वाद झाले होते. या कारणावरून त्याने एमआयडीसीत दहशत निर्माण केली होती. पाण्याचे टॅंकर पुरविण्याच्या कारणावरून त्याने लोकांचा छळ केला होता. संतोष गायब झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकारानंतर तो उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला टिटवाळा, जि. ठाणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले.
मांजरे याच्यावर खून, खंडणी, दरोडा आदी गंभीर व किरकोळ स्वरूपाचे अनेक गुन्हे महाळुंगे इंगळे पोलीस चौकी व चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कामगिरी सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळचे मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची सूचना व मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रेय गुळीग, चंद्रकांत गवारी, राजू जाधव, राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वाडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, श्रीधन इचके, हिरामण सांगडे, शरद खैरे आदींनी केली. महाळुंगे इंगळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत