शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Published: March 18, 2017 4:38 AM

‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. ८०३ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, बिंदूनामावली अद्याप पूर्ण

- बापू बैलकर,  पुणे

‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. ८०३ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, बिंदूनामावली अद्याप पूर्ण न झाल्याने ना नवीन भरती होतेय ना समायोजन. मात्र, ग्रामविकास विभागाने आता ३१ मार्चपर्र्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही प्रक्रिया आजही इनप्रोसेसच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिक्षक नसल्याने दुर्गम तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. बिंदूनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्यात रोस्टरचे काम सुरू आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून (प्राथमिक) सांगितले जात आहे. जिल्हा परिषद स्थापनेपूर्वीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने तेव्हाची माहिती देणार कशी, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. रोस्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन तसेच भरती करता येत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात फक्त प्राथमिक शिक्षकांची ८०३ पदे कमी आहेत. यात मुळशी, वेल्हे, भोर या दुर्गम तालुक्यात शिक्षक नसल्याने एक शिक्षकी शाळा तर नेहमीच बंद असल्याचे चित्र आहे. येथील शिक्षक कामानिमित्त बाहेर गेले, की शाळेला सुट्टी. तर काही ठिकाणी विद्यार्थीच शाळा चालवत आहेत. ही परिस्थिती असल्याने तेथील गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. एकीकडे शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांच्या रोषाला जिल्हा परिषद प्रशासनाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी असे ४५० शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत. हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोस्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात आहे, त्यामुळे या शिक्षकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. या अगोदर रोस्टर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेने रोस्टर आजही सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे सबमिट केले नाही. आठ दिवसांपासून निवड याद्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्याचे तपासायचे काम आता कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे गेली अडीच वर्षे शिक्षण विभाग काय करीत होता? असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत. ठराव करूनही भरती नाही...- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर ५० टक्के पदे भरण्याचा ठराव करण्यात आला. तशी तयारीही शिक्षण विभागाने केली. मात्र, शिक्षण संचालनालयाने रोष्टर पूर्ण नसल्याने पदे भरता येणार नाहीत, असे कळविले. त्यामुळे ठराव करून पदे भरली गेली नाहीत.तपासणीसाठी दोनच कर्मचारी२३ हजार कार्यालयांचे काम एकाच विभागाकडे सहायक आयुक्त मागासवर्ग कक्षाकडे, पाच जिल्ह्यांतील सुमारे २३ हजार कार्यालयांच्या रोस्टर तपासणीचे काम असून, त्यांच्याकडे यासाठी मनुष्यबळाचीही कमतरता आहे. त्यामुळे महिन्याचा प्रोग्राम तयार करून दररोजचे येथील कामकाज सुरू आहे.सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांना आम्ही रोस्टर पूर्ण करून पुन्हा तपासण्यास दिले आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्यास सांगितले असून, आमचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.-दौलत देसाई , अध्यक्ष, जिल्हा परिषद