Ajit Pawar: 'आज गडी लय जोरात हाय...जास्त बोलत नाही'; अजित पवार आणि राजेंद्र पवारांत रंगला चिमट्यांचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 09:10 AM2021-11-03T09:10:38+5:302021-11-03T09:11:03+5:30

Ajit Pawar, Rajendra Pawar in Baramati: बारामती येथे मंगळवारी अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार  बोलत होते. तत्पूर्वी, प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी त्यांच्याबाबत एक तक्रार केली.

A game of tweezers between Ajit Pawar and Rajendra Pawar in Baramati, presence of Sharad pawar, Uddhav Thackeray | Ajit Pawar: 'आज गडी लय जोरात हाय...जास्त बोलत नाही'; अजित पवार आणि राजेंद्र पवारांत रंगला चिमट्यांचा खेळ

Ajit Pawar: 'आज गडी लय जोरात हाय...जास्त बोलत नाही'; अजित पवार आणि राजेंद्र पवारांत रंगला चिमट्यांचा खेळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती  : ‘आमचे बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा, आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे. मात्र, त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जास्त बोलत नाही. कारण आमचे ते मोठे बंधू आहेत,’ या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना कोपरखळी मारली. 

बारामती येथे मंगळवारी अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार  बोलत होते. तत्पूर्वी, प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही, अशी तक्रार केली. हाच धागा पकडून अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना, ‘आज गडी लय जोरात आहे, बंधुराज नोंद घेतलेली आहे एवढेच सांगतो,’ अशा शब्दांत कोपरखळी मारली. या वक्तव्यावर सभागृहात चांगलीच खसखस पिकली. 

ठाकरेंकडूनही फिरकी 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘अजितदादा आणि राजेंद्र तुम्ही दोघांनी आधी ठरवा आणि मग माझ्याकडे या. दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करू’, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Web Title: A game of tweezers between Ajit Pawar and Rajendra Pawar in Baramati, presence of Sharad pawar, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.