शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

जीएसटीमुळे यंदा गणपतीबाप्पा महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:30 AM

गणेशोत्सवाला अवघ्या महिनाभराचा कालावधी बाकी असल्याने गणेशभक्तांना बाप्पाचे आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबरच कुंभारवाड्यातही लगबग पाहायला मिळू लागली आहे

भूगाव : गणेशोत्सवाला अवघ्या महिनाभराचा कालावधी बाकी असल्याने गणेशभक्तांना बाप्पाचे आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबरच कुंभारवाड्यातही लगबग पाहायला मिळू लागली आहे. गणेशमूर्ती विक्रीसाठी नेण्यापूर्वी कारागीर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. जीएसटी लागू झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीही जवळपास ३० ते ३५ टक्के महाग झाल्या आहेत.दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीचा दिवस करीत गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त असलेले कारागीर अखेरचा हात मारून रंगरंगोटीचे काम पूर्ण करीत आहेत. अनेक कारागीर गणेशमूर्ती, तसेच गौरीचे आकर्षक मुखवटे तयार करीत आहे. यावर्षी मल्हार, बिंदूसार, महाराजा, लालबागचा राजा, मयूरेश्वर आदींसह अष्टविनायकांच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी लोकांकडून होत आहे. याही वर्षी विविध प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध असणार आहेत. आगाऊ बुकिंग केल्यास मूर्तीमध्ये थोडा नफा मिळत असला, तरी गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती वर्षभर सांभाळण्यापेक्षा आल्या त्या भावात मूर्ती विकायला लागते; तसेच वर्षातून काही दिवसांचेच हे काम असल्याने त्यानंतर रोजगारासाठी कुठलीही कामे करावी लागतात, अशी शोकांतिका एका मूर्ती विक्रेत्याने व्यक्त केली.रंगसाहित्य, प्लास्टर व अन्य गोष्टींवर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीकाम महागले आहे. त्याचा परिणाम यावर्षी मूर्तीकामावर झाला असून यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीही जवळपास ३० ते ३५ टक्के महाग झाल्या आहेत. लहान घरगुती मूर्तींपासून मोठ्या मूर्तींच्या दरात वाढ झाली. -दत्ता नेहे, मूर्तीकार, भूगाव