पुणे : मोबाईल, इंटरनेटवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल १६ लाख २६ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३७ वर्षांच्या महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च २०१८ पासून सुरू होता. आरोपी आणि फिर्यादी यांची मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रोजेक्टच्या कामासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून थोडे थोडके नव्हे, तर तब्बल १६ लाख २६ हजार ९४२ रुपये बँक खात्यास भरणा करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्याची डेबीट, क्रेडिट कार्ड विश्वासाने मिळवून त्यातून गैरव्यवहार केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.