पुणे: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायदा जबरदस्तीने अंमलात आणून केंद्र सरकार देशात विभाजनवादी धोरण अवलंबत आहे असा आरोप करून त्याला विरोध म्हणून मुंबई ते दिल्ली दरम्यान गांधी शांती यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा ९ जानेवारीला पुण्यात येत असून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या यात्रेत नेतृत्व करत आहे. राष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. गांधी भवनच्या वतीने ९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता गंधी भवन येथे शांती यात्रेचे स्वागत करण्यात येणार अहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी ही माहिती दिली. गांधी भवन येथे स्वागत कार्यक्रमानंतर यशवंत सिन्हा व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाहीर सभेद्वारे पुण्यातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत.गांधी भवन येथे ९ जानेवारीला रात्री यात्रेचे मुक्काम असेल. १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे रवाना होईल. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले. नाशिकहून सुरत, आणंद, राजकोट, पोरबंदर, उदयपूर, आग्रा, मथुरा,अलीगढ, राजघाट या मार्गे यात्रा दिल्लीत पोहचेल.
गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 9:23 PM
नागरिकत्व कायदा दुरूस्तीला विरोध
ठळक मुद्देराष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे केले आयोजन १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे होईल रवाना