दरवर्षी गणेश जयंतीनिमित्ताने देवस्थानचे वतीने होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह यावेळी साधेपणात साजरा होत आहे.
पहाटे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास लोखंडे व उपाध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक,महापूजा व आरती करण्यात आली. दुपारी गणेश जन्माचा उत्साव पारंपरिक पध्दतीने संपन्न झाला. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्रशेठ शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, विजय वर्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे उपस्थित होते. देवस्थानचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
चौकटीसाठी मजकूर
या वेळी छाया व सतीश विठ्ठ्ल बेळे या बहीणभावांचे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सीआरपीएफ व आसाम रायफल्समध्ये खडतर परिश्रम करीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निवड झाल्याबद्द्ल देवस्थानचे वतीने रक्कम रु. १०,००० व लेण्याद्री ग्रामविकास मंडळ मुंबई, गोळेगावचे वतीने रक्कम रु.१०,००० प्रोत्साहन म्हणून देण्यात आली.
श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेशजयंती उत्सवात गणेशजन्म सोहळ्यास उपस्थित भाविक.