शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

विसर्जन मिरवणूक : पुण्यातील मानाचे गणपती टिळक चौकात दाखल होण्यास सुरुवात, कसबा आणि तांबडी जोगेश्वरीचे आगमन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 4:11 PM

अवघ्या दीड किलोमीटरचे अंतर कापण्यास लागले सुमारे 5 तास.. 

पुणे : पुण्याच्या गणेश उत्सव वैभवात मनाचे स्थान असलेल्या मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरुवात झाली. रंगावलीच्या नयनरम्य पायघड्या...आकर्षक रंगावली, ढोलताशांचा गगनभेदी निनाद आणि पुणेकरांच्या जल्लोषपूर्ण गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक संथ गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे टिळक चौकात दाखल होण्यास कसबा गणपतीला तीन १० मिनिट आणि तांबडी जोगेश्वरीला सुमारे पावणेचार वाजले.यादरम्यान पावसाच्या हलक्या शिडकाव्याने गणरायावर वर्षासरींची उधळण केली.      शहरातील मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीचा ' 'श्रीगणेशा' करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष माधुरीताई मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक प्रसन्न जगताप, महेश लडकत, आदित्य माळावे, राजेश येनपुरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, मनीषा लडकत, रिपाईचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होत्या. तसेच उप महापौर सिध्दार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकीशोर राम कसबा गणपतीला हार घालून 'श्रीं' चे दर्शन घेतले.

 रस्त्याच्या दुतर्फा पुणेकरांनी मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबांसह मिरवणूक पाहण्यास आले होते. मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी टिळक चौकातून महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारून विसर्जनासाठी रवाना झाला. अवघ्या दीड किलोमीटरचे अंतर कापण्यास लागले सुमारे 5 तास.. 

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जन