सासवड : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यास सामोरे जाताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन भोर-पुरंदर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे भोर उपविभागीय कार्यालय व सासवड पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय यांच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते, अमर गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण, गणेश जगताप, संग्राम चव्हाण, चिन्मय निरगुडे, गणेश बडदे, पोलीस पाटील सारिका खवले, विद्या ताकवले, आरती जगताप, सुनीता कामठे, रूपाली कुंभारकर, वृषाली कादबाने, सारिका झेंडे, कविता झुरंगे, लियाकत मुजावर आदी उपस्थित होते.
काेरोनामुळे स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे अपेक्षित असल्याने भपकेबाज सजावट करणे टाळावे. तसेच गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर कोणीही प्रक्षोभक लिखाण करू नये. सासवडमधील दोन मंडळांचा वाद लक्षात घेता योग्य बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बैठकीस सासवड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत १२५ मंडळापैकी ३३ मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिली.
या वेळी निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी, निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बडे यांनी २०२ पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीबाबत गणेश उत्सव मंडळामार्फत जनजागृती करणे, मतदान प्रक्रिया व मतदानाचे महत्त्व याबाबत जनजागृतीचे संदेश देणारे देखावे, पोस्टर, बॅनर किंवा ऑनलाईन संदेश यावर स्पर्धेचे आयोजन करण्याचे आवाहन या वेळी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
030921\1829-img-20210903-wa0016.jpg
????? ????????? ?????????? ?????? ??????? ????? ????????? ??????? ????? ?????