यवत: येथील गणेश उत्सव सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा होत असला, तरी धार्मिक कार्यक्रम साजरे करत सार्वजनिक मंडळांनी उत्सवाची पारंपरिकता जपली आहे.
यवतमधील सार्वजनिक गणेश उत्सवाला ६५ ते ७५ वर्षांची परंपरा आहे. दर वर्षी गणेश उत्सवाच्या आधी एक महिना सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू होते. मात्र, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे. गर्दी टाळून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे.
यवतमधील पाहिल्या मानाचा समजल्या जाणाऱ्या नूतन तरुण मंडळाचे यंदा ७५ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बाजापेठेतील सर्वांत मोठे मंडळ असलेल्या श्रीनाथ मित्र मंडळाने आकर्षक आरास करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठपणा केली आहे. अध्यक्ष विलास दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, दिलीप यादव, गणेश कदम, सदानंद दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, गणेश थोरात यांनी येथील गणेशाचे आशीर्वाद घेतले. यवत स्टेशन येथील हनुमान मित्र मंडळाचे देखील यंदा ६५ वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे यांच्या मार्गदशनखाली मूर्तीची स्थापना केली आहे.
सुतारवाडा येथील राजा शिवछत्रपती मित्रमंडळाचे यंदा ३९ वे वर्ष असून मंडळाने संदीप चाफेकर, मिनेश गुजर , अमोल भट, बाबा काका अवचट, राजू काका अवचट, प्रकाश चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भवानीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळाने अध्यक्ष काका नलावडे यांच्या मार्गदर्शनखाली मंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. बाजारपेठ येथील नवदीप मित्र मंडळाने नीलेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अखिल व्यापारी मंडळाने देखील आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
गराडेवस्ती येथील बाप्पा मोरया मित्रमंडळाने आकर्षण मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून "यवतचा राजा" नावाने या मंडळाची भव्य मूर्ती गणेश उत्सवातील सर्वांचे आकर्षणाचा बिंदू असते. रायकरमळा येथील साई गणेश मंडळाने आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सूरज भाऊसाहेब रायकर, शुभम कैलास बधे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भीमा पाटस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके यांच्या घरी गौरी-गणेश समोर केलेली आकर्षक सजावट आकर्षक ठरली.
फोटो