कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशाचे आगमन सोहळा, महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. पोलीस यंत्रणा, जनतेचे आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करून मंडळाने यंदा गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पूजल्या जाणाऱ्या लहान गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच मंडळाने यंदाचे हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहे. या पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने कोविड योद्धयांचा सन्मान, असे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. पण रक्तदान सुरू ठेवा. शारीरिक अंतर राखून रक्तदान करावे, अशी विनंती शासनाकडून केली आहे. त्यानुसार सहयोग मित्रमंडळाने राज्य शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळत आणि काळजी घेत रक्तदान शिबिर केले.
श्रीक्षेत्र महाळुंगे येथे सहयोग मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर.