शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत; गणेशोत्सवात साधेपणा, सामाजिक उपक्रमावर देणार भर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 4:54 PM

पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका, ऑनलाईन भर देत तसेच सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी

पुणे : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आपण जवळचे लोक गमावले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन भर देत तसेच सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला जाईल. अशी भूमिका मंडळांनी घेतली आहे. पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सव पूर्वतयारी २०२१ या  मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळांच्या अध्यक्षांनी आपली मते मांडली आहेत. 

दीड वर्षात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. कोरोनाबाबत जनजगृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळांना झिरो बजेट कार्यक्रम द्यावेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी असेही ते म्हणाले आहेत. गणेशोत्सव ३० दिवसांवर येऊन ठेपला आहे. वैभवशाली उत्सवावर कोरोनाने सावट अजूनही आहे. त्याच पार्शवभूमीवर मंडळांची बैठक घेण्यात आली होती. गणेश मूर्ती विर्सजनावर या बैठकीत महत्वाची भूमिका मांडली.

कार्यकर्ते म्हणाले, महापालिकेने मूर्तीदान या उपक्रमाचा विचार करावा. त्यांचे स्टोरेज करण्याची तयारी करावी. तसेच लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. शहरातून साडे चार लाख मूर्ती विसर्जन होत असतात. त्यसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. 

परिस्थिती पाहून ऑनलाईन कार्यक्रम 

गणेशोत्सव साधेपणा ने साजरा होणारच आहे. पण असंख्य कार्यक्रम, शिबिरे हि जर ऑनलाइनच्या माध्यमातून राबवली. आणि गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. तरी युट्यूब, फेसबुकवर हे कार्यक्रम वर्षानुवर्षे राहतात. त्यानुसार या कर्यक्रमांवर भर द्यवा 

पोलीस आणि प्रशासन यांच्यात तफावत शहरात जास्तीत जास्त निर्बंध असतात. उपनगरात त्या तुलनेत निर्बंध वाढवणायची गरज लागत नाही. प्रशासन नियम वेगळे सांगते. पोलिसांकडून नियम अजुन कडक केले जातात. दोघांच्यात तफावत नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजन, कीर्तने, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाला परवानगी मिळाली आहे. त्यासाठी नियमावली जाहीर करावी. 

''पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे महापालिका स्वागतच करत आहे. मंडळांना उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. २०१९ ला जे परवाने देण्यात आले होते. तेच यावर्षी चालणार आहेत. कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन येण्याची गरज भासणार नाही. तसेच मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम हौद वाढवण्याबरोबरच, गणेश मूर्ती विसर्जनसाठी लागणाऱ्या पावडर मुबलक प्रमाणात मागवण्यात आली आहे. तसेच शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, मैदाने आणि मोकळया जागेत पाण्याचे हौद बांधण्यात येणार आहेत. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.'' 

''पुणे शहरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना सहकार्य केले जाईल. मंडळांनीही समाजभान ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करावा. असे आवाहन पुणे महानगपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवMayorमहापौरPoliceपोलिस