"गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:14 PM2021-08-08T18:14:57+5:302021-08-08T18:16:01+5:30

मंदिरे उघडण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नाही

Ganeshotsav will be decided at the state level; But it is possible that the festival will be over | "गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील"

"गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील"

googlenewsNext
ठळक मुद्दे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई, पुण्यातील महत्वाच्या मंडळांशी चर्चा करणार

पुणे : ज्या भागात गर्दी होते. त्याठिकाणी कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणवर होत असतो. असे निर्विवादपणे पुढं आलं आहे. त्यामुळे या काळात आपण आपल्या उत्साहाला मुरड घातली पाहिजे. तरीही गणेशोत्सवाचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच मंदिरे उघडण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

गणेशोत्सवाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होत असते. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई, पुण्यातील महत्वाच्या आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करत असतात. असही ते म्हणाले. 
 
सण उत्सव याबाबत बोलताना ते म्हणाले,  कोरोना काळात काही थोडीशी बंधनं पाळली पाहिजेत. त्याला विलाज नाही. हे करावंच लागेल आणि सगळ्यांना ऐकावंच लागेल. साधारणपणे एक गोष्ट लक्षात आलीय की जिते लोकांची गर्दी होते तिथं कोरोनाचा फैलाव वाढतो. उदाहरण घ्यायचं झालं तर पंढरपूर, माळशिरसमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. करमाळा पॉझिटिव्हिटी रेट 9.2, पंढरपूरमध्ये 8.6, माढा 7.7, माळशिरस 7.4 टक्के आहे. 

राज्यातील मंदिरं सुरु होणार का?
राज्यातील मंदिर, अन्य धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत काही निर्णय होऊ शकतो का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारच्या स्तरावर निर्णय होईल. जिल्हा पातळीवर अशाप्रकरचा कुठलाही निर्णय होणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यातील मंदिरे, अन्य धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत अद्याप कुठल्याही निर्णयाची शक्यता नसल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने , हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ग्रामीण भागात मात्र चार  वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. 

Web Title: Ganeshotsav will be decided at the state level; But it is possible that the festival will be over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.