शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

बारामतीतील कसबा फलटण चौकात धुडगूस घालणारा ‘गँग’ म्होरक्या अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 8:06 PM

बारामती शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

बारामती : बारामती शहरातील एका हॉटेलचालकावर दहशत बसविण्यासाठी त्याच्या डोक्यात तलवारीने वार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. तसेच या हॉटेलची तोडफोड देखील करण्यात आली होती. पोलिसांनी आता या गँग म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव हे फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज मध्ये गेले. तेथे जाऊन हॉटेल चालकासह व कामगारांवर दहशत बसवण्यासाठी तसेच त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली. हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीच्या डोक्यात १३ टाके पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चंदनशिवे व  बच्छाव यांना अटक केली होती. कुचेकर गुन्हा केल्यानंतर मुंबई येथे फरार झालेला होता. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल च्या कलमाप्रमाणे (३०७,३८४,४२७,१४३ ,१४७ ,१४९ सह आर्म अ‍ॅक्ट ं४२५ )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश कुचेकर व त्याची गँग या भागात वारंवार गुन्हे करते. त्यांच्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच संघटित गुन्हेगारी थोपपवण्यासाठी करावी लागणारी कारवाई होणार आहे. त्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले. आरोपीवर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,सहायक पोलीस निरीक्षक  कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर ,पोलीस शिपाई तुषार चव्हाण ,पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी कारवाई केली आहेत. 

...भीतीपोटी अनेक जण तक्रार देत नाहीत आदेश कुचेकरने काही महिन्यापूर्वी नितीन वाईन्स या दुकानावर सुद्धा तोडफोड करून हल्ला केला होता. तसेच एका कसब्यातील युवकालाही मारहाण केली होती. ज्या दिवशी हा गुन्हा केला, त्याच दिवशी त्यांनी चैत्राली बारमध्ये सुद्धा धुडगूस घातला होता. परंतु भीतीपोटी अनेक व्यावसायिक तक्रार देत नाहीत. तरी नागरीकांनी कुणाच्या तक्रारी असल्यास पोलीस ठाण्याशी  संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक