बारामती : बारामती शहरात बारामतीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, सध्या रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) व राहुल पांडुरंग तांबे (वय २८, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि.पुणे) अशी बारामती शहर पोलिसांनीअटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यात महिलांच्या गळयातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरी प्रकरणी तपासाच्या अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात पोलिसांना सूचना दिल्या होत्या. या सुचनेनंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी नेमण्यात आली. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे (वय २४, रा.कोहाळे बुद्रुक, ता. बारामती) यांने बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तसेच पत्ता विचारण्याच्या बहाणा करून शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गळयातील सोन्याचे गंठण जबरीने हिसकावून चोरून नेल्याचे सांगितले. आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याच्याकडुन एकुण ३ लाख रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहेत.
या गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.