: ६ जणांना केली अटक
आव्हाळवाडी : पुणे-नगर महामार्गावर सिगारेटची गाडी लुटण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. पोलीसांनी ८ लाख ३८ लाखांचा माल जप्त केला असून ६ जणांना अटक केली आहे.
गणेशन पेयांडी तेवर, शिवकुमार करपैया तेवर, पंडियेन सेहदू वैकट, सरवान गणेशन लचामी, गणेशन ओच्च तेवर, सेलवराज अंथन उनिखंडी (सर्व रा. तामिळनाडू) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १ जानेवारी रोजी बंदोबस्ताच्या अनुषंगाने नगररोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आंतरराज्यातील टोळी पुणे-नगर महामार्गावर सिगारेटची गाडी लुटण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखा पथक व लोणीकंद पोलिसांनी सापळा रचून संशयितांसह गाडी ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये तामिळनाडूच्या सहाजणांकडून ६ मोबाईल, २ लोखंडी कोयते, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, पान्हे तसेच ११ तोळे ७०० ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमीनी जप्त करण्यात आली आहे. ही टोळी ही पुणे-नगर हायवेवर सिगारेटच्या गाडीवर दरोडा टाकून लुटण्याचा तयारीत होती. सहाजणांना मुद्देमालसह पुढील तपास कामी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेल्या काही आरोपींवर खून व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
फोटो ओळ : स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलिसांनी मुद्देमालासह अटक केलेले आरोपी