पुणे - सध्या पुण्यामध्ये गुंडागर्दी पहावयास मिळते. याच गुंडा गिरीचा एक भाग कात्रज भारती विद्यापीठ परिसरामध्ये पाहावयास मिळाला. भारती विद्यापीठ परिसरात एका हॉटेलच्या बाहेर पंधरा-वीस तरुणांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडते त्यावेळी हॉटेल चालक हॉटेलच्या बाहेर जाऊन भांडण करावीत हॉटेलमध्ये भांडण करू नये अशी विनंती करत असताना जमलेल्या टोळक्यांकडून, गुंडा कडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. गुन्हेगारी टोळके एवढ्यावरच न थांबता काही वेळाने हॉटेल चालक ससून रुग्णालयात मेडिकलसाठी जात असताना त्याला रस्त्यातच अडून त्याच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला . सुदैवाने हॉटेल चालक व त्याचा मित्र तिथून पळाला मात्र त्याच्या गाडीवर या गुन्हेगारी टॉळक्यांकडून पेट्रोल टाकून त्याची गाडी पेटवून देण्यात आली. आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व नागरिक बघ्याची भूमिका घेत होते परंतु कोणाचीही हिंमत पुढे जाण्याची होत नव्हती, टोळक्याकडून परिसरात भीतीचे वातावरण, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत अमित खैरे या हॉटेल चालकांनी सविस्तर सांगितले की हॉटेलमध्ये काही टोळके एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा वाद विकोपाला जाणार होता हे लक्षात आल्यावर त्यांना बाहेर थांबण्याची विनंती केली त्यावेळी हॉटेलमध्ये नुकसान होऊ नये यासाठी मी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली परंतु त्यांनी मला घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी त्यांना विनंती करत असताना काही गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. मला त्यांनी मारहाण केली त्यानंतर मी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तात्काळ फोन करून कळवले असता त्यांनी मला ससून रुग्णालय येथे मेडिकल करण्यासाठी जाण्यास सांगितले. मी मेडिकल करण्यासाठी जात असताना माझ्या रस्त्यात दबा धरून बसलेले काही गुन्हेगार यांनी मला अडवले व आमच्या विरोधात तू गुन्हा दाखल करतो का? तुला आमची दहशत माहित नाही का? आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही.
असे बोलून त्यांनी माझ्या अंगावर पेट्रोलने भरलेली बाटली फेकली मी व माझा मित्र आमच्या अंगावर पूर्णपणे पेट्रोल पडले होते त्यातच त्यांच्यातील एकाने माचिसची एक काडी पेटून आमच्या अंगावर फेकली ती चुकून आम्ही रस्त्याने गाडी रस्त्यात टाकून पळत सुटलो होतो. गाडी सोडून आम्ही तेथून पळालो परंतु त्यांनी आमच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी पूर्णपणे जाळून टाकली अशी फिर्याद अमित खैरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खिल्लारे यांना याबाबत विचारले असता सदर घटनेचा आम्ही पूर्णपणे तपास करत असून लवकरात लवकर आरोपींना अटक करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर तक्रारदार यांनी सांगितले की यातील काही मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सुदैवाने मी त्यातून वाचलो परंतु अशी घटना घडू नये यासाठी त्यांनी पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे विनंती करतो आहे.