शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
2
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
3
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
4
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
5
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
6
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
7
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
8
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
9
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
10
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
12
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
13
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
14
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
15
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
16
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
17
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
18
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
19
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
20
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

बाप्पा मोरया! यंदाच्या गणेशोत्सवात 'श्री पंचकेदार मंदिरात' विराजमान होणार दगडूशेठचे गणपती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:16 PM

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३० व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे. कोविड महामारीमुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना पुन्हा एकदा याजागी श्रीं चे दर्शन घेता येणार आहे. यंदाची सजावट असलेले श्री पंचकेदार मंदिर उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित असलेल्या आणि अत्यंत पवित्र असलेल्या भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर या नावाने प्रसिध्द आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंड मधील गढ़वाल येथे स्थित असून शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून हिमालयातील मंदिर स्थापत्याची प्रतिकृती असेल. भगवान शिवाच्या पंचमुखी रुपाची प्रतिष्ठापना या मंदिराच्या ललाट बिम्बावर असून, हिमालयातील मंदिरशिल्प समूहाची ही कलात्मक पुर्नरचना असणार आहे. गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या अष्टमूर्तींचे प्रतिक असलेले गर्भगृह आणि प्रत्यक्ष शिवाचे वाहन नंदीच्या शिल्पाने आणि अनेक देवता, शिवगणांच्या, सुरसुन्दरींच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या, लता-वेलींच्या मूर्तीरुप उपस्थितीने श्रीगणरायाचे यंदाचे श्रीपंचकेदार मंदिर, म्हणजे प्रत्यक्ष शिवलोक असेल. श्रीपंचकेदारमंदिर म्हणजे तीर्थ स्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर असून त्या मंदिरसमूहाचे दुर्लभ दर्शन गणेशोत्सवात घडेल.

केदार हे नाव प्रत्यक्ष शंकराचे असून केदारनाथाचे मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे. हे शिव स्थान हिंदू धर्मातील तीर्थस्थळांत छोटा चारधाम या नावाने देखील महत्वाचे आहे. हिमालयातील इथल्या पाच शिवमंदिरांचे क्षेत्र केदारक्षेत्र किंवा केदारखंड या नावाने देखील ओळखले जाते. अशा या देवाधीदेव महादेवाच्या पाच मंदिर समूहांचा म्हणजे श्री पंचकेदार मंदिराची अत्यंत मनोहारी प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी यावर्षी गणेशउत्सवात समर्पित करण्यात येत आहे.

श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात ४० कारागिर दिवस-रात्र कार्यरत राहणार असून त्यानंतर राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

टॅग्स :Dagdusheth Templeदगडूशेठ मंदिरGanesh Mahotsavगणेशोत्सवTempleमंदिरSocialसामाजिक