- सुलेखा न्याती, न्याती ग्रुप
-----------------------------
महिलांना आरक्षण नको, पण समानतेचा दर्जा हवाय. मी दिल्लीत असताना कशी जाणार? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांना उबरने जाईन असं म्हटलं. पण दिल्ली मध्ये 7 नंतर कुणी उबरने जात नाही असे सांगण्यात आलं. पण पुण्यात आता हे शक्य आहे का? असे वाटायला लागलंय. पुणे महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. पीएमपी, उबर किंवा रिक्षाचालक संघटनांशी चर्चा करून कोणती पावले उचलली जाणार आहेत. ते विचारता येईल. सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करू शकतो? याचा विचार करून पावले उचलूयात.
- संगीता ललवाणी
------------------------------------
समाजाचा महिलांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कायदे कडक झाले पाहिजेत, असे म्हटले जात असले तरी कायदा हे उत्तर नाही.
- ॲड. दिव्या चव्हाण
----------------------------
एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केलेल्या आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. ज्यायोगे परत त्यांचे हे धाडस होणार नाही.
- मैथिली गायकवाड
------------------------
कोरोनाकाळात महिलांवरील हिंसाचार वाढत आहे. त्यासाठी आम्ही एक उपक्रम राबविला. ग्रामीण भागात अत्याचाराची फारशी वाच्यता केली जात नाही. यासाठी महिला सुरक्षा दक्षता समिती स्थापन केली. या समितीने घरोघरी जाऊन महिला पीडित आहे का? अशा केसेस शोधून काढल्या. ही समिती स्थापन केल्यावर ‘‘बाई घरापर्यंत येऊ नका’ असा दबाव टाकण्यात आला. पण, आम्ही समुपदेशनातून प्रश्न सोडवला. पीडित महिलांचा डाटा कलेक्ट केला. सभागृहातील अनेक सदस्यांच्या घरातही अशा घटना घडल्याचे समोर आले. जिल्ह्यात 900 केसेस सोडविण्यात यश आले. त्यातील फक्त 65 केसेस पोलिसांकडे द्याव्या लागल्या.
- पूजा पारगे, सभापती, महिला व बाल कल्याण, जि.प
------------------------
आपण ग्रुप किंवा संघटनांच्या माध्यमातून महिलांचा दबाव गट तयार केला पाहिजे. प्रत्येकवेळेस पोलिसांवर विसंबून राहाता कामा नये. महिलांनी आता रणरागिणी आणि रणचंडिका व्हायला हवे.
- रंजना लोढा
----------------------
ड्रायव्हर काका आणि कामवाली मावशी म्हणते, वूमन ड्रायव्हयिंग का नाही करत? महिला खूप वाईट पद्धतीनं गाडी ड्राईव्ह करतात असे म्हटले जाते. पण यात तथ्य नाही, हे जोक्स थांबले पाहिजेत.
- ऐश्वर्या कर्नाटकी
-----------------------
बलात्काराची घटना घडली की कँडल मार्च, मोर्चे काढले जातात. पण, घटनांचे प्रमाण कमी होत नाही. आरोपींमध्ये भीतीच उरलेली नाही. समाजात अशा अनेक घटना घडतात, पण त्या दाबल्या जातात. याकरिता सपोर्ट ग्रुप निर्माण व्हायला हवेत.
-सोनिया अगरवाल कंजोटी
-------------------------
‘ती चा गणपती’ जसा बसवण्यात आला आहे, तसेच एक ‘ती’चे ॲप असण्याची गरज आहे.
- उमा ढोले पाटील
----------------------
ओला, उबर कुणीतरी प्रसिद्धीला आणले तसे ‘ती’चे ॲप आणले तर तेही नावाजले जाईल. महिला, मुली, मुले किंवा तृतीयपंथी लैंगिक आणि भावनिक अत्याचार होत असतील तर सहन करता कामा नये. लैंगिक शिक्षण विचारात घेतले जात नाही. मुलाला योग्य आणि अयोग्याचे धडे द्यायला हवेत.
- दीपा गाडगीळ
-----------------------