कळस : इंदापूर तालुक्यात शुक्रवारी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून, गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्यातील नेत्यांच्या घरीही लाडक्या बाप्पाचे साधेपणाने आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सभापती प्रवीण माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना, पूजा केली.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भरणेवाडी येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी पत्नी सारिका भरणे उपस्थित होत्या. कोरोनाचे राज्यावरील संकट दूर करण्याची व पाऊस लवकर पडण्याची प्रार्थना गणरायापुढे करून गणेशोत्सवाच्या काळात गर्दी न करता गणेशोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन भरणे यांनी केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही इंदापूर येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्यासमवेत सहकुटुंब विधीवत पूजा करून गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण जगावर असलेले कोरोनाचे संकट दूर होऊन तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषेदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य प्रवीण माने यांच्या इंदापूर येथील घरीही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माने यांनीही कोरोनाचे संकट दूर होवो, ही प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी केली.
फोटो...