लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गायन, वादन व नृत्य या संगीतातील तिन्ही शाखांतील नवोदित व प्रथितयश कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे 'गानवर्धन' संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृष्णा गोपाळ उपाख्य उर्फ कृ. गो. धर्माधिकारी (वय ८६) यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले.
कोरोनातून निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावली. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कुमुद, पुत्र सुधीर, कन्या सविता हर्षे आणि जावई डॉ. भास्कर हर्षे असा परिवार आहे. पुण्यातील संगीत क्षेत्रात धर्माधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होतेच, पण त्याचबरोबर ते एका औषध निर्माण कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होते. धर्माधिकारी यांनी १९७८ साली ‘गानवर्धन’ची स्थापना केली. गेली ४३ वर्षे हा संगीत यज्ञ अखंडपणे सुरू आहे.
फोटो - कृ.गो. धर्माधिकारी