पुणे : खडकवासला धरणातून जाणाºया मुठा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणाचे, दुरुस्तीचे आणि गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, गाळामधे सुमारे ५ हजार २५० क्युबिक मीटर ( ३० टक्के) कचराच असल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून थमार्कोल, प्लास्टिकपासून विविध प्रकारच्या कचऱ्याचाच गाळ लक्षणीय असल्याचे पाटबंधारे विभागीतल अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक वषापार्सून नवीन उजवा मुठा कालव्याची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नव्हती. गेल्यावर्षी पर्वती पायथ्याला कालवा फुटल्याने दांडेकर पूल वसाहतीतील अनेक घरे वाहून गेली होती. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. यंदा धरणसाखळीत जोरदार पाऊस झाल्याने कालवा जवळपास दीड महिने वाहता होता. त्यामुळे खडकवासला धरणापासून शून्य ते तीस किलोमीटर या शहर हद्दीतील कालव्याच्या भरावांचे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आत्तापर्यत जवळपास २० किलोमीटर पर्यंतच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. शहर परिसरातून वाहणाºया कालव्यामधे तब्बल १७ हजार ५०० घनमीटर गाळ होता. या गाळापैकी ५ हजार २५० घनमीटर (३० टक्के) कचराच आहे. त्यात थमार्कोलचे तुकडे, निर्माल्य, प्लास्टीक अशा विविध प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे. या शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्याच्या आतील आणि बाहेरील बाजुची झीज झाली होती. कालव्या लगत असलेल्या सेवा रस्त्यांची रुंदी कमी झाल्याचे आढळून आले होते. मुरुमटाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. तर, कालव्याच्या आतील बाजुचा वाहून गेलेल्या भागाचीही डागडुजी करण्यात आली. हडपसर आणि बी. टी. कवडे रस्ता येथे कालव्यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. वडगाव आणि धायरी येथील कालव्यालगतचा रस्ता आणि वाहून गेलाला भाग दुरुस्त करण्यात आला. सारसबाग, स्वारगेट आणि पूलगेट येथील दुरुस्तीची कामे देखील झाली आहेत. लवकरच राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील, असे पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी सांगितले. जानेवारी महिन्यामधे सिंचनासाठी रब्बी आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कालव्याच्या दुरुस्तीची आणि मजबुतीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.
मुठा कालव्यातून निघतोय कचऱ्याचा गाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:09 PM
दुरुस्तीची काम युद्धपातळीवर : सव्वापाच हजार घनफुटांचा कचरा
ठळक मुद्देकालव्यातून थमार्कोल, प्लास्टिकपासून विविध प्रकारच्या कचऱ्याचाच गाळ लक्षणीयकालव्याच्या आतील बाजुचा वाहून गेलेल्या भागाचीही डागडुजी जानेवारी महिन्यामधे सिंचनासाठी रब्बी आवर्तन सोडण्याचे नियोजन