अभोर : शहरातील चौपाटीवरून जाणाऱ्या महाड-पंढरपूर रोडच्या आजूबाजूला प्लॅस्टिक कचरा, शिळे अन्न; तसेच कचरा अस्तव्यस्त पडत असून, कचराकुंड्या निर्माण होत आहेत. घाणीची दुर्गंधी येत असून रोगराई पसण्याची भीती आहे. त्यामुळे घाण करणाऱ्या मंगल कार्यालये, हॉटेल, ढाबे, टिंबर, भाजीपालावाले, मटन विकणारे व इतर दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.भोर-मांढरदेवी व भोर शहरातून चौपाटीवरून जाणाऱ्या महाड-पंढरपूर रोडवरील उत्रौली फाटा ते महाँगीर ओढा वेनवडीपर्यंतच्या व भोर ते वरंध घाटापर्यंतच्या रस्त्यावर त्याचप्रमाणे भोर-पुणे रस्त्यावर अनेक ठिकाणी हे चित्र पाहावयास मिळत आहे. प्लास्टीक कचरा, हॉटेल व लग्न समारंभात उरलेले अन्न, पत्रावळ्या, घाण कचरा, राहिलेला भाजीपाला रस्त्याच्या दुतर्फा टाकला जातो. केरकचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर येऊन पडतो. खराब कचरा व अन्न खाण्यासाठी मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वावर त्यामुळे वाढला आहे. शिळे अन्न व भाजीपाल्याचा उग्रवास सुटतो. याचा नाहक त्रास नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागतो. (वार्ताहर)दारूच्या बाटल्या टाकतात शेतात : परिसर बकाल होईल1 मांढरदेवी यात्राकाळात येणाऱ्या भाविकांना, हौशे नवशांना मंदिर परिसरात पशुहत्या करण्यावर बंदी असल्याने कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्त्यावरील दुतर्फा शेतात कोंबडी, बकरी कापून त्याचे नैवेद्य शिजवून मांढरदेवीला घेऊन जातात. त्यामुळे शेतात घाण केली जाते. तर काही भाविक दारू पिऊन बाटल्या शेतातच टाकतात. अनेकदा बाटल्या फोडून टाकल्या जातात. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना शेतीची मशागत करताना होतो. अनेकदा बैलांच्या व शेतकऱ्यांच्या पायात काचा घुसतात.2 भोर शहरातील नीरा नदीपुलाजवळील पात्रात, रामबाग ओढ्यात, नीरा देवघर डाव्या कालव्यात भोर तालुक्यातील व शहरातील रस्त्यांच्या दतर्फा आणि वाहळीत केरकचरा, प्लास्टीक आणि शिळे अन्न, मटन, मासे टाकणाऱ्या हॉटेल, ढाबे, मंगल कार्यालयांच्या मालकांची बैठक घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ते बंद झाले होते. मात्र, पुन्हा सुरुवात झाली आहे. यावर कारवाईची गरज असून तरच ते थांबणार आहे. अन्यथा, भोर शहर बकाल होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.भोर शहर व परिसरात रस्त्यावर व आजूबाजूला, नदीपात्रात प्लास्टीक, कचरा व घाण टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.- तृप्ती किरवे, नगराध्यक्षा
भोरच्या परिसरात निर्माण होताहेत कचराकुंड्या!
By admin | Published: January 13, 2017 2:22 AM