‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:27 PM2019-03-12T15:27:29+5:302019-03-12T15:28:06+5:30

भाजपच्या पदाधिका-यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे कच-याची समस्या गंभीर झालेली आहे...

garbage gift to Pimpri Chinchwad Municipal Commissioner's... | ‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

Next

पिंपरी : महापालिकेची स्वच्छतेत पिछाडी झाल्याबद्दल महापालिका आयुक्तांना विरोधीपक्षाच्या वतीने कचऱ्यांचा बुके देण्यात आला. अभिनव पद्धतीने स्वच्छतेमध्ये झालेल्या पिछाडीचा निषेध करण्यात आला. 
पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला होता. मात्र, भाजपाची दोन वर्षांपूर्वी सत्ता आली अन जे शहर महाराष्ट्रात नंबर वन व देशात नवव्या क्रमांकावर होते. सन २०१७ मध्ये ७२ व्या स्थानी गेले तर सन २०१८ मध्ये शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. आता त्यानंतर यावर्षी ५२ व्या क्रमांकावर गेले. त्याबाबत आयुक्तांना कचऱ्यांचा गुच्छ भेट दिला. यावेळी विरोधी पक्षनपेते दत्ता साने, नगरसेवक राजू बनसोडे, विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, विनोद नढे उपस्थित होते. 
याबाबत विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरु आहेत. परंतु, प्रत्यक्षात भाजपाचा आणि आपला कारभार नियोजन शुन्य आहे. भाजपच्या पदाधिका-यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कच-याची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपच्या पदाधिका-यांनी कचरा सुध्दा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करुन टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपाने कचरा सिटी करुन टाकली आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कच-यांचे ढीग साठले आहेत. कचरा विलनीकरणाचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काळात तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकालामध्ये पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकवर होते तर देशात ९ व्या क्रमांकवर होते.

केंद्र सरकारच्या निदेर्शानुसार शहरातील एक रेल्वेस्टेशन,एक बसस्टॉप एक चौक व एक रस्ता व एक झोपडपट्टीची पाहणी करुन गुण दिले जातात.   शहरातील चिखली परीसर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, विद्यानगर झोपडपट्टी, रामनगर गांधीनगर या परीसरात जाऊन तेथील सार्वजनिक शौचालय, मुता-या, रस्ता , कचरा इत्यादीबाबत पाहणी करणेबाबत सुचविले होते. या भागाची पाहणी जर सदस्यांनी केली असती तर आता जो ५२ वा नंबर आला आहे तो तर सोडाच पण पहिल्या १०० मध्ये आपल्या शहराचा समावेश झाला नसता.  कच-याची मोशी डेपोपर्यत वाहतूक करणे, डेपोत कचरा विलनीकरण करुन त्यावर प्रक्रीया करणे या बाबींतील त्रुटीमुळे शहर पिछाडीवर पडलेले आहे.  हे प्रशासनाचे आणि सत्ताधाºयांचे अपयश आहे. 

Web Title: garbage gift to Pimpri Chinchwad Municipal Commissioner's...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.