शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावातील कचरा प्रश्न पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 2:01 PM

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गावातील रस्तावरील कचरा ग्रामपंचायतीने उचललाच नाही..

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक प्रभाव : सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर चिखलफेक

अमोल अवचिते - पुणे : मांजरी गावातील रस्त्यावरील कचरा अनेक दिवसांपासून उचलला गेला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत कचरा वेळेत उचलत नसल्याने गावात चांगलेच राजकीय युद्ध पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावाचा कचरा प्रश्न पेटला असल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गावातील रस्तावरील कचरा ग्रामपंचायतीने उचललाच नाही. गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा कुंडी भरून वाहू लागली आहे. कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यासोबत कचरादेखील वाहत जातो. कच्चे रस्ते त्यावर साचलेला कचरा आणि चिखल यामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहने चालवणे आणि चालत जाणेदेखील अवघड झाले आहे. कचºयाच्या वाढत्या साम्राज्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. ग्रामपंचायतीकडून शासनाच्या देखभाल जमिनीवर म्हणजेच गायरानावर एकूण सतरा एकर जागेपैकी सध्या साडेनऊ एकर जागेवर कचऱ्याचे डम्पिंग केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र कचरा वर्गीकरण करण्याची कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नाही. उघड्यावरच गावातील एकत्रीत कचरा आणून टाकला जातो. काही प्रमाणात जागेवर खोदलेल्या खड्ड्यांमध्येच कचरा जिरवला जात आहे. 

कचरा वर्गीकरण केंद्रावर कचरा टाकण्यासाठी दोन रस्ते आहेत. त्यापैकी एक रस्ता लष्कराच्या हद्दीतून तर दुसरा रस्ता लोकवस्तीतून जातो. लष्करच्या हद्दीतून जाणारा रस्ता अधिकाऱ्यांनी अडवला आहे. तर लोकवस्तीतून जाणारा रस्ता अतिशय खराब असून रस्त्यावर १० ते १५ फूट काळी माती आहे. मुसळधार पावसामुळे चिखल झाला असून कचरा डेपोवर गाड्या जाणं शक्य नाही. त्यामुळेच कचरा टाकता आला नाही. पर्यायी गावातील कचरा उचलण्यात आला नाही. नैसर्गिक कारणांमुळेच अडचण निर्माण झाली आहे. असे ग्राम विकास अधिकारी अनिल कुंभार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.डम्पिंग केंद्रावर जाण्यासाठी ग्रामपंचायत रस्ता का बनवू शकत नाही? कचरा प्रश्न सोडविण्यास ग्रामपंचायत का उदासीन आहे? की राजकीय वादामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळाला जातोय? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. .........लष्कराकडून कचरा टाकण्यास विरोध होत आहे. तसेच दुसरा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने कचºयाच्या गाड्या रुतून बसतात. त्यामुळे कचरा उचलण्यास उशीर झाला. आदर पूनावाला यांच्या सहकार्याने कचरा उचलला जात आहे. मागील ग्रामपंचायत सदस्य मंडळाने कचºयाचे नियोजन योग्य प्रकारे केले नव्हते. दहा ते पंधरा वर्षांत त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. त्या तुलनेत आम्ही योग्य नियोजन करून कचरा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या आठ ते दहा महिन्यांत कचरा प्रश्न सोडविण्यात येईल. नैसर्गिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. - शिवराज घुले, सरपंच.........ग्रामपंचायत सत्ताधाºयांना कचरा प्रश्न हाताळता येत नाही. वैशाली बनकर महापौर असताना त्यांना विनंती करून उरुळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोवर महापालिकेला दरमहा दहा हजार रुपये भाडे देऊन गावातील कचरा टाकण्याची परवानगी घेतली होती. मात्र आताच्या सदस्य मंडळाने ते रद्द करून गावातच कचरा टाकण्यास सुरुवात केली. ज्या जागेवर कचरा टाकला जात आहे. त्याच्या शेजारी लष्कराची जमीन असल्याने लष्कराकडून कचरा टाकण्यास विरोध होत आहे. तसेच येथे जंगल असून झाडांना कचºयाला लागत असलेल्या आगीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच आज कचºयाचा प्रश्न चिघळला आहे. - दिलीप घुले, जिल्हा परिषद सदस्य........विधानसभा निवडणुकीनंतरच कसा कचºयाचा प्रश्न गंभीर झाला़? भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव झाल्यामुळेच ग्रामपंचायत सदस्य मंडळाने कचरा उचला नाही. कचºयाचा प्रश्न गंभीर करून सत्ताधारी नागरिकांवर रोष व्यक्त करत आहेत. राजकीय पराभवामुळेच नागरिकांना वेठीस धरले जात आहे. पावसाचे कारण पुढे करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विकासाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रश्न सोडविला गेला नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल.- अजिंक्य घुले, पंचायत समिती सदस्य .........रस्ता खराब आहे, असे सांगितले जात आहे. तसेच पावसामुळे कचरा उचलणे शक्य होत नाही. अशी विविध कारणे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहेत, हेच मोठे अपयश आहे. सत्ताधाºयांना अशी कारणे सांगणे शोभत नाही. अपयश मान्य करून कचºयाचा गंभीर प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. ग्रामपंचायत सदस्य मंडळच या प्रकाराला जबाबदार असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. यामध्ये राजकारण मध्ये न आणता प्रश्न सोडवण्यात यावा.- नीलेश घुले...............रस्त्यावर साठलेल्या कचºयाच्या ढिगाºयामुळे आरोग्य प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने कचरा वेळेत उचलावा. तसेच कचरा पेट्या मोठ्या आकाराच्या ठेवल्या तर रस्त्यावर कचरा पडणार नाही. कचरा गाड्या घरोघरी आल्या तर रस्त्यावर पडणाºया कचºयाचे प्रमाण कमी होईल. - रंजना घुले, रहिवाशी.................कचºयाचे ढीग साचल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. डास, चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कचरा वेळेत उचलावा - बबलू सिद्धीकी, रहिवाशी............ग्रामपंचायतीकडून वेळेवर कचरा उचलला जातो. मात्र पावसामुळे दिरंगाई होत आहे, याची जाणीव असून आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा वेळेत उचलावा.- सहदेव लटके, रहिवाशी

टॅग्स :ManjriमांजरीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नsarpanchसरपंच