कुरूळी : पुणे-नाशिक महामार्गावर इंद्रायणी नदीकाठी मोशी ते चाकण या महामार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले असून, दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. कुरुळी, चिंबळी,आळंदी फाटा, या महामार्गावरील गावांमध्ये औद्योगीकरण व मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली लोकसंख्या यामुळे कचऱ्याची समस्या या परिसरात दिवसंदिवस गंभीर होत चालली आहे, कुरुळी परिसरातील इंद्रायणी नदीकिनारी, चिंबळी फाटा येथील मोई चौक, कुरुळी फाटा, आळंदी फाटा, या ठिकाणी महामार्गावर प्लास्टिक कचऱ्यासह घनकचरा मोठ्या प्रमाणात टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील गावांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निघतो आहे, या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे सर्व ग्रामपंचायतीपुढे मोठे आव्हान आहे, कुरुळी व परिसरातील सर्व ग्रामपंचायती चे कर्मचारी घंटागाडी गावभर फिरून कचरा गोळा करत दवंडी देऊन प्रबोधन करीत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करीत काही स्थानिक नागरिक, कंपन्यांमध्ये नोकरी करणारे, हॉटेल व्यावसायिक, तसेच या गावांमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत असलेले कामगार कामावर जाता जाता घरातील कचरा या रस्त्यांवर बिनधास्तपणे फेकत आहे,प्लास्टिकच्या लहान मोठ्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून हा कचरा टाकला जात असून हा कचरा उचलला जात नसल्याने तिथेच साचून कुजत पडून सडतो आहे,त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्यावर वावरणारी भटकी कुत्री, यांच्यामुळे परिसरात घाण आणि संसर्ग पसरत आहेच. त्याचबरोबर हा कचरा डासांसारखे कीटक, चिलटे, माशा यांच्या उत्पत्तीसाठी पूरक ठरला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
--
चौकट
सध्या पावसामुळे या कचऱ्यावर पाणी साचले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असून स्थानिक नागरिकांसह रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर परिसरातील ग्रामपंचायतींनी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे .जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई होत नाही तोपर्यंत नागरिक याबाबत गांभीर्याने घेणार नाही असे दिसत आहे.
--
फोटो ०८ पुणे-नाशिक महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य.
080921\20210908_171204.jpg
फोटो ओळ:पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथील मोई चौकात साचलेला कचऱ्याचा ढीग