नगरपरिषदेच्या मध्यभागी असणाऱ्या खुल्या जागेत हे गार्डन बनविले असून या ठिकाणी विविध प्रकराची ५५ वैविध्यपूर्ण झाडे विविध रंगांच्या कुंड्यांमध्ये लावली आहेत. गार्डनमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ सेल्फी स्टँडवर लावली आहे. नगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिक पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन सेल्फी काढत आहे. गार्डनच्या सभोवती निसर्गाशी संबंधित पंचतत्वाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आकर्षक भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत.
संपूर्ण गार्डनमध्ये हरित गालिचा अंथरल्याने सुजलाम - सुफलामतेचा अनोखा अनुभव कार्यालयात गेल्यानंतर मिळतो. आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सर्व विषय समिती सभापती व विद्यमान नगरपसेवक यांनी या गार्डनमध्ये हरित शपथ घेऊन शहरात जास्तीत जास्त ठिकाणी झाडे लावून येत्या काही दिवसांत आळंदी शहराला हरित आळंदी बनविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
फोटो ओळ : आळंदी नगरपरिषदेने कार्यालयात बनविलेले गार्डन आणि सेल्फी पॉइंट.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)