राहू : खामगाव येथील प्रकाश दळवी यांनी दोन एकर उसाच्या खोडवा पिकातंर्गत गरवी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. सध्या पावसाचे वातावरण कांदा पिकाला अनुकूल नसतानाही त्यांनी चांगल्या प्रतीचा कांदा आणला आहे. कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवत परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कांद्याच्या आंतरपिकाला ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च भागून पैसे शिल्लक राहत असल्याचे प्रकाश दळवी यांनी सांगितले. उसाची लागवडही त्यांनी पट्टा पद्धतीने घेतली. दोन सऱ्यांमधील अंतर साडेतीन फूट ठेवले आहे. उसाच्या पहिल्या पिकाच्या वेळीही त्यांनी अंतर्गत पीक म्हणून काकडी लागवड केली होती. सध्या खोडव्यामध्ये त्यांचा कांदा जोमात आहे. त्यामुळे उसाचे ८0 ते ९0 टक्के टन उत्पादन अपेक्षित आहे.
ऊस पिकात गरवा कांदा
By admin | Published: October 16, 2015 1:07 AM