पुणे : करवाढ करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावत नगरसेवकांची उधळपट्टी सुरू असतानाच महापालिका अधिकाऱ्यांच्या घरात वातानुकूलित यंत्रणा (एसी) बसविण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. त्यासाठीची निविदा विद्युत विभागाने काढली असून, त्याअंतर्गत आठ लाख रुपयांचे एसी खरेदी करण्यात येणार आहेत. यात काही पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचाही समावेश असल्याची शक्यता आहे. पालिकेच्या अधिकारी पदाधिकारी यांच्या निवासाच्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेकडून अधिकाऱ्यांना निवासस्थान दिले जात असले तरी त्यांना वातानुकूलन यंत्रणा, गीझरसारख्या सुविधा देत नाही. हवे असल्यास ते स्वखर्चाने घेणे आवश्यक असते. मात्र, नियम धाब्यावर बसवीत ही यंत्रणा बसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत ४पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तर निवासस्थानसुद्धा मिळत नसते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी अशी यंत्रणा बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता त्यांच्या खासगी घरी जर अशी यंत्रणा बसवली जाणार असेल, तर ज्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी ही यंत्रणा बसविली जाणार आहे, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. तसेच हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही कुंभार यांनी केली आहे.
जनतेच्या पैशांतून ‘गारवा’
By admin | Published: February 17, 2015 11:47 PM