जिल्हा नियोजन मंडळाकडून शवदाहिनीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जुन्नर नगरपालिका ही गॅस शवदाहिनी बसविणारी पहिलीच नगरपालिका असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. पर्यावरणपूरक व कमी वेळात अंत्यसंस्कार हा गॅस शवदाहिनीचा फायदा आहे. जुन्नर शहरामध्ये सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता व भविष्याचा विचार करता सदरहू गॅस शवदाहिनी उपयुक्त ठरणार आहे. गॅस शवदाहिनीकरिता ४८ सिलिंडर लागणार आहेत. एका सिलिंडरमध्ये २ मृतदेहांवर सुमारे ६५० अंश सेल्सिअस तापमानात साधारणतः १५ मिनिटांमध्ये अंत्यसंस्कार पूर्ण होतील. सर्व सोयींयुक्त गॅस शवदाहिनी ही शहरवासीयांसाठी भविष्याचा वेध घेता गरजेची आहे. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व शहर अभियंता विवेक देशमुख व सर्व पदाधिकारी यांनी शवदाहिनीच्या कामासाठी पाठपुरावा केला.
०२ जुन्नर
जुन्नर नगरपालिकेच्या वतीने शवदाहिनीच्या कामास सुरुवात करताना नगराध्यक्ष शाम पांडे व अधिकारीवर्ग.