पुणे - कर्वे रोडवरील एस. एन. डी. टी. महाविद्यालयासमोर एका टँकरमधून रात्री साडेदहा वाजता गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. परंतु, हा नट्रोजन गॅस असल्याने त्याचा काही त्रास होण्याची शक्यता नसल्याचे अग्निशामन दलाने सांगितले. याबाबतची माहिती अशी, औरंगाबाद येथील सागर गॅसेस या कंपनीचा गॅस टँकर कर्वेरोडने कोथरुडच्या दिशेने जात असताना अचानक रात्री साडेदहा च्या सुमारास त्यातून गॅस गळती होण्यास सुरुवात झाली़ हे पाहून चालकाने टँकर कडेला उभा करुन तो फरार झाला. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी आली़ अधिका-यांनी पाहणी केल्यावर तो गॅस नट्रोजन असल्याचे व त्याचा मानवी शरीराला काहीही अपाय होत नसल्याचे सांगितले. या टँकरचे पाईप खराब झाले असून तो बंद करता येत नाही. त्यामुळे टँकर शहराबाहेर नेऊनच तो गॅस रिकामा करणे हाच पर्याय असल्याचे सांगितले. काही वेळाने पोलिसांनी टँकरचालकाचा शोध घेऊन त्याला बोलावून आणले़ त्यानंतर रात्री रात्री बाराच्या सुमारास टँकर तेथून हलविण्यात आला.
पुण्यातील कर्वे रोडवर गॅस गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 12:34 AM