सरपंच मनीषा काटकर म्हणाल्या की, ग्रुप ग्रामपंचायत मार्गासनीकडून ५ टक्के निधीतून ३५ अपंगांना गॅस शेगडी आणि १५ टक्के निधीमधून ४५ मागासर्गीय कुटुंबांना वॅाटर फिल्टरचे वाटप करण्यात आले. अडवली, अस्कवडी, भागिनघर, खांबवडी, मार्गासनी ही पाच गावे ग्रुप ग्रामपंचायत मार्गासनी अंतर्गत येत असून ग्रामपंचायतीकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत ३५ अपंग व्यक्ती असून या अपंग व्यक्तींना स्वयंपाकासाठी लाकडाच्या चुलीवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु अपंगांना गॅस शेगडी दिल्याने चुलीवर अवलंबून राहता येणार नाही, तसेच मानवी शरीरातील ८० टक्के आजार हे केवळ पाण्यामुळे होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मागासर्गीय ४५ कुटुंबांना पाण्याचे फिल्टर वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच मनीषा काटकर,उपसरपंच दत्ता गायकवाड सदस्या अर्चना वालगुडे,हर्षदा दीक्षित,अर्चना धायगावे,सोनाली कुंभार,जयश्री पानसरे,सदस्य संजय वालगुडे,माऊली दसवडकर गणेश पानसरे,संभाजी इंगुळकर,ग्रामसेवक रुपेश हारपुडे,लिपिक गणेश यादव,शिपाई समीर वालगुडे,सामाजिक कार्यकर्ते मोहन काटकर,विशाल वालगुडे उपस्थित होते.
२६ मार्गासनी
मार्गासनी येथे पाच टक्के निधीतून अपंगांना गॅस शेगडीचे वाटप सरपंच मनीषा काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.