पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावाजवळ बुधवारी (दि. ११) सकाळी गॅस भरलेला टँकर उलटला. सुदैवाने गॅस टँकरला गळती न झाल्याने पुढील धोका टळला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, इंदापूर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही भागातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. पुण्याहून गॅस भरलेला एच. पी. कंपनीचा टँकर सोलापूरकडे निघाला होता. पळसदेव गावाजवळ हा टँकर आला. याच वेळी पुढे जात असलेल्या ट्रकने बे्रक मारला. त्यामुळे गॅस भरलेल्या टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. टँकर महामार्गावर उलटला. रस्त्यावर आडवा पडलेल्या टँकरमध्ये गॅस असल्याचे लक्षात येताच पोलिसांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर इंदापूर महामार्गावर पोलीस, इंदापूर पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक एन. नरूटे, तसेच तसेच पोलीस कर्मचारी शामराव गायकवाड, अंकुश नाईकवडे, शंकर पासगे, राजाराम जगताप, तानाजी मोरे, नवनाथ नलवडे, अमोल शिंदे, तसेच मधुकर शिंदे, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुणे-सोलापूर महामार्गावर गॅस टँकर उलटला
By admin | Published: May 12, 2016 1:20 AM