बारामती : बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली आहे. इतके दिवस आपण दुकानात जावुन गॅस सिलिंडर आणत असु. पुर्वीच्या काळात मी देखील दातेंच्या दुकानात गॅस सिलिंडर आणण्यास जात असल्याची आठवण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही माहिती दिली.यावेळी पवार पुढे म्हणाले, शहराला गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठाकरण्यासाठी काही ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार आहे.याबाबत नगराध्यक्षापौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना सुचना देण्यात आल्या आहेत. गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईनंतर तेपुर्ववत होतील,याची दक्षता घेण्यात येईल.त्यासाठी आवश्यक निधी देखीलमंजुर करण्याचे सुतोवाच पवार यांनी केले. नगरसेवक जय पाटील यांच्यातांदुळवाडी प्रभागासह,बीजगुणन केंद्राच्या जागेवर अशी दोन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.शनिवारी(दि १८) सकाळी शहरातील विकासकामांची पाहणी करताना तुळजारामचतुरचंद महाविद्यालयात येताना अनेक विद्यार्थी रेल्वे रुळ धोकादायकपध्दतीने ओलांडत असल्याचे दिसुन आले.त्याबाबत सब वे तयार करण्यात येणार आहे.यासंदर्भात त्याचवेळी मोबाईलवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर केंद्र सरकारची आवश्यक मंजुरी घेण्यासाठी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.—————————————