चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे येथील सन १९९९/२००० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तब्बल २१ वर्षांनी झाला.
या वेळी अर्चना मोरे, संजय मोतलिंग, शैलेश बाजारे, तानाजी देशमुख,मनोज रेड्डी,सुर्यकांत किंद्रे,रवि मोराळे,दिपाली तारे रेणुका जाधव,मधुबाला चौरे,शारदा पवार,सचिन खांदवे,राजेंद्र सोनवणे,विजय गुळवे,जयवंत थोपटे,शिवाजी जेजुरकर
राजू नारकर,प्रकाश सैदाणे,संगीता जाधव,पूनम शिंदे,ज्योती सागळे,,हनुमंत मनेरे,विजय वाघ,रुक्साना पानसरे
राहुल चव्हाण,विजय दाते उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय वाघ व तानाजी देशमुख यांनी केले.
१९९९/२००० या साली मनात ध्येय घेऊन शारीरिक शिक्षक
(बीएड फिजिकल) होण्यासाठी आलेले विद्यार्थी बीपीएडचा कोर्स पूर्ण झाल्यावर अनेकजन शिक्षक झाले, तर अनेकांना नोकरी मिळाल्या नाहीत. त्यामुळे काही जण इतर नोकरीत तर अनेक जन स्वत:चा उद्योग व्यवसाय करत आहेत. काॅलेज पूर्ण झाल्यानंतर उद्योग व्यवसाय नोकरीमुळे एकत्र येता आले नव्हते. मात्र काॅलेजचा व्हाॅट्सअॅप ग्रुप कार्यरत असल्याने एकत्र येऊन गेट टुगेदर करण्याचा निर्णय झाला. त्याला सर्वानुमते मान्यता देऊन पुणे येथे गेट टुगेटर घेण्यात आले. २१ वर्षांत प्रत्येकात बरेच बदल झालेत.
२१ वर्षांनी आपले मित्र, मैत्रिणी भेटणार याचा सर्वांनाच आनंद होता, त्यामुळे प्रत्येकाने काॅलेजनंतर नोकरी मिळवण्यापासून ते विविध व्यवसाय करण्यापर्यंत जीवनात आलेला अनुभव, खालेल्या खस्ता याची माहिती प्रत्येकाने आपआपल्या मनोगतात दिली. संजय मोतलिंग यांनी आभार मानले .
चंद्रशेखर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.