त्या जुन्या शाळा-महाविद्यालयाच्या आठवणी प्रत्येक जण आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत होता. दहा वर्षांनंतर भेटल्यावर कुणी सरकारी नोकरीत, कुणी खासगी कंपनीत, कुणी शिक्षक, कुणी राजकारणी, कुणी शेतकरी, कुणी पत्रकार असे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात आपल्या ठिकाणी स्थिर झालेला. अनेक वर्षांच्या भेटीनंतर सगळ्यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या. सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले.
या वेळी पंकज बहिरट, प्रमोद नरवडे, संदीप कणसे, प्रदीप भूमकर, संदेश वायकर, दिनेश मवाळ, अजित शिरतर, दीपक गायकर, रवींद्र कुसाळकर, विनायक निमसे, आनंद भद्रीगे, गणेश काळे यांचा समावेश होता. भेटीनंतर प्रत्येकाने संकल्प केला की, सहा महिन्यांतून वर्षातून एकदा आपण सर्वांनी भेटायचे. म्हणजे प्रत्येकाशी असलेलं नात टिकवता येईल. अनेक वर्षांच्या भेटीनंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला.
१४ पुणे