या वेळी आचार्य नंदिवर्धनसागर सूरीश्वरजी,
आचार्य हर्षसागरसूरीश्वरजी, श्री रमणीकमुनिजी, श्री विरागसागरजी, अमीतगुनाश्रीजी, नमीवर्षाश्रीजी अमितज्योतीजी, हिमानीजी महाराज आदी साधू-साध्वीजी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आचार्य प.पू श्री नंदिवर्धनसागरसूरीश्वरजी म्हणाले, 'अजैन कुटुंबात जन्म घेऊनही दीक्षा घेऊन ज्यांनी आपल्या जीवनातील ८२ वर्षांचा कालावधी हा जैन समाजासाठी दिला, अशा गुरूंचे सान्निध्य लाभणे, हे परमभाग्य आहे. स्थानकवासी संघाने मूर्तिपूजक संप्रदायातील गच्छाधिपतींचा गौरव करणे, हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
रमणीकमुनिजी म्हणाले, ' जैन धर्मीयांसाठी जणू धर्मग्रंथ असलेले आगमसूत्र ज्यांच्या जीवनाच्या कणाकणात सामावले आहे, अशा गच्छाधिपतीजींच्या गौरव* सोहळ्याच्या या घटनेचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत, हे आपले सौभाग्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.
या वेळी माजी राज्यमंत्री उल्हास पवार, पोपटलाल ओस्तवाल, अचल जैन, विजय भंडारी आदी उपस्थित होते.