सरपंच पदासाठी गौतम आवारी व उपसरपंचपदासाठी विजया देवाडे यांचे उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नवीन गुंडाळ यांनी जाहीर केले. यावेळी किसन आवारी, आरती शिंदे, सचिन कलवडे, आशा कलवडे, सुनीता कलवडे हे सर्व सदस्य उपस्थित होते.
सरपंचपद सर्वसाधारण पुरुष या वर्गासाठी खुले असताना कोणतीही रस्सीखेच न होता निवडणूक बिनविरोध पार पडली. अनेक सरपंच व उपसरपंचपदासाठी सदस्यांना सहलीला, देवदर्शनाला पाठविले. परंतु येथील सर्वच सदस्यांनी गावात राहत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पाहून वेगळा आदर्श इतर ग्रामपंचायतीसाठी ठेवला हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य राहिले आहे.
या वेळी नारायण देवाडे, शंकर आवारी, मनीषा ठाकूर, उषा आवार, संभाजी शिंदे, अमोल राऊत, नबाजी देवाडे, संतोष अवारी, रामू कुदळे, बाळासाहेब देवाडे, सीताराम देवाडे, दत्ता आवारी, दत्ताशेठ शिवेकर, सुनील कलवडे, अंकुश राऊत, बबन बांदल, अशोक ससाणे, राजू ससाणे, मोहन आवारी, मारुती कुदळे आदी ग्रामस्त उपस्थित होते . ............................................................. फोटो